सुरु झाली कपूर आणि भट्ट कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी? 2020 मधील मुहूर्त, सब्यसाची बनवणार आलियाचा लग्नाचा लहंगा
Sabyasachi Mukherjee, Alia Bhatt and Ranbir Kapoor (Photo Credits: Instagram)

एकेकाळी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पदुकोन हे बॉलीवूडमधील सर्वात चर्चित कपल मानले गेले होते. कालांतराने दोघांमध्ये फाटले, दोघांचे रस्ते बदलले. दीपिकाने रणवीरशी लग्न करून संसार थाटला. तर तिकडे रणबीरच्या आयुष्यात आली आलिया भट्ट (Alia Bhatt). या दोघांनी आपल्या नात्याबद्दल तसा जाहीर खुलासा केला नसला तरी, सर्वांनाच इथे काहीतरी डाळ शिजत आहे हे माहित आहे. आता तर 2020 मध्ये आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

SpotboyE यांनी दिलेल्या वृत्तानुसार हे लग्न याआधीच होणार होते, मात्र ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे लग्न पुढे ढकलले. आता ऋषी कपूर ठीक झाले आहेत, सप्टेंबरमध्ये ते परत येतील. त्यामुळे लग्नाची तयारी जोरात सुरु झाली आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीय लवकरच पुजाऱ्याची भेट घेऊन मुहूर्त काढणार आहेत. 2020 च्या सुरुवातीचा हा मुहूर्त असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये आलियाने डिझाईनर सब्यसाची (Sabyasachi) याची भेट घेतली होती, या भेटीत आपल्या लग्नाच्या लहेंग्याबद्दल चर्चा झाली. (हेही वाचा: अबब ! रणबीर कपूरच्या आयुष्यात आल्या होत्या इतक्या स्त्रिया)

यावरून हे स्पष्ट होत आहे की कपूर आणि भट्ट कुटुंबीय लवकरात लवकर आपल्या घरी सनईचे सूर वाजावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. सब्यसाची हा लग्नाच्या कपड्यांसाठी फारच प्रसिद्ध आहे. याआधी बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा अशा तारकांनी आपल्या लग्नातील कपड्यांसाठी सब्यसाचीला प्राधान्य दिले होते. दरम्यान, सध्या आलिया आणि रणबीर दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात व्यस्त आहेत. याच चित्रपटामुळे त्या दोघांमधील जवळीक अजून वाढली.