बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’ अर्थात रणबीर कपूरने आज 36व्या वर्षात पदार्पण केले. एक दशकाहून अधिक आपल्या अभिनयाने लोकांवर भुरळ पाडणाऱ्या रणबीरचे चाहते संपूर्ण जगात आहेत. वेक अप सीड, अजब प्रेम की गजब कहानी, ये जवानी है दिवानी, 'रॉकस्टार, संजू, तमाशा, बर्फी हे रणबीरचे काही लोकप्रिय चित्रपट. आपल्या लूक्स आणि स्टाईलमुळे रणबीरवर फिदा होणाऱ्या तरुणींची संख्या अधिक आहे. रणबीरला बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ असेही म्हटले जाते. कारण चित्रपटांसोबतच रणबीरच्या अनेक अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्याची चर्चा नेहमीच होत असते. रणबीरने आत्ता पर्यंत बऱ्याच अभिनेत्रींना डेट केले आहे मात्र कोणतेच नाते जास्त काळ टिकू शकले नाही. चला तर पाहूया अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत थोड्या काळासाठी का होईन पण रणबीर रिलेशनशिपमध्ये होता.
अवंतिका मलिक –
रणबीर चित्रपटांमध्ये यायच्याही आधी, कॉलेजच्या दिवसांमध्ये रणबीर डेट करत होता अवंतिका मलिक हिला. त्यांचे हे नाते तब्बल 5 वर्षे चालले मात्र काही कारणांनी दोघे विभक्त होऊन दोघांनीही आपापल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. कालांतराने अवंतिकाने अभिनेता इम्रान खानसोबत लग्न केले.
नंदिता महतानी –
रणबीर कपूरचे हे एक सर्वात आश्चर्यचकित करणारे रिलेशनशिप होते. भलेही नंदिता आणि रणबीर कॅमेरासमोर एकत्र कधीच आले नाहीत मात्र, इंडस्ट्रीमध्ये या दोघांच्या नात्याची चर्चा जोरदार होती. नंदिता ही करिष्मा कपूरच्या आधीच्या नवऱ्याची पहिली पत्नी आहे.
सोनम कपूर –
साँवरिया या चित्रपटामधून रणबीर आणि सोनम यांनी एकत्रच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच चित्रपटामधील दोघांची केमिस्ट्री पाहून हे दोघे डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती, मात्र एका कार्यक्रमात रणबीर हा ‘बॉयफ्रेण्ड मटेरियल’ नाही’ असे सांगून सोनमने या नात्यावर पडदा टाकला होता.
दीपिका पदुकोन –
रणबीर आणि दीपिका या दोघांच्याही आयुष्यातले हे सर्वात सिरीयस रिलेशनशिप होते. दीपिका आणि रणबीर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हे दोघे एकमेकांत इतके गुंतलेले होते की, दीपिकाने रणबीरच्या नावाच्या अक्षराचा टॅटूही मानेवर गोंदवून घेतला होता. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. ‘एका वेगळ्या मुलीसाठी रणबीरने मला सोडले.’ असे दीपिका एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती. दीपिकाच्या मनावर या ब्रेकअपने इतका मोठा आधात केला की, त्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती.
कॅटरिना कैफ –
दीपिकासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कॅटरिनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. रणबीरच्यामते फक्त कतरीनानेचे रणबीरच्या हृदयावर खऱ्या अर्थाने राज्य केले. अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटादरम्यान हे दोघे जवळ आले. ही जोडी अनेक वर्षे लिव्ह-इनमध्येही राहत होती मात्र ‘जग्गा जासूस’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. सांगितले जाते की रॉकस्टारची नायिका नर्गिस फाकरी ही रणबीर आणि कतरीनाच्या ब्रेकअपला कारणीभूत होती. सूत्रांनुसार, कॅटरिनासोबतच्या अफेअरमुळे रणबीर आणि सलमानमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
माहिरा खान –
कतरिनानंतर रणबीरच आयुष्यात आली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. दुबईतील एका कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. त्यावेळचा दोघांचा सिगारेट पितानाचा फोटो फारच व्हायरल झाला होता. पण दोघांनीही ते सिंगल असून आनंदी आहेत. असे सांगीतल्यानंतर या नात्याची चर्चा थांबली.
आलिया भट्ट –
सध्या रणबीर कपूर हा आलिया भट्टला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. रणबीर हा आलियाचा खूप वर्षांपासूनचा क्रश आहे. सध्या दोघंही आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
या अभिनेत्रींव्यतिरिक्त रणबीरचे नाव नर्गिस फाकरी, श्रुती हसन, अमिषा पटेल यांच्यासोबतही जोडले गेले. पण कालांतराने या फक्त अफवाच होत्या हे सिद्ध झाले.