Bigg Boss Marathi 2, 1st June 2019, Weekend चा डाव Updates: 'हा' झाला बिग बॉसच्या घरातील पहिला कप्तान; तर महेश मांजरेकरांनी निवडले स्टार सदस्य
Bigg Boss Marathi 2, 1st June 2019, Day 6 Episode (Photo Credit : Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, Episode 7 Highlights: बिग बॉसच्या कालच्या भागात कप्तानपदासाठी चुरस सुरु झाली आहे. सध्या घरात नॉमिनेट असलेल्या सदस्यापैकी शिव आणि नेहाचे नाव कप्तानपदासाठी पुढे आले आहे. या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. आजच्या भागाची सुरुवात शिवानीच्या मनात असलेल्या परागबद्दलच्या रागाने होते. आपण परागला कसा त्रास दिला ते ती माधवला सांगते. त्यानंतर ती बिचुकले यांना आपले समान व्यवस्थित ठेवण्याच्या कामाला लावते.

कप्तानपदासाठी उभे असलेल्या शिव आणि नेहा यांच्यासाठी, अनुक्रमे वीणा आणि बिचुकले प्रवक्ते दिले जातात, ज्यांना थोडक्यात आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. अखेर मतदानाची प्रक्रिया पडते (इथे बिचुकले नेहाचे प्रवक्ते असूनही ते शिवला मत देतात), आणि यामध्ये सर्वात जास्त मते मिळाल्याने शिव हा बिग बॉसच्या घरचा पहिला कप्तान होतो. यावर चिडलेल्या नेहा आणि बिचुकले यांच्यामध्ये शाब्दिक वादावाद घडते. (इथे प्रवक्त्यापेक्षा उमेदवाराची प्रतिमाही तितकीच महत्वाची असते हे बिचुकले यांचे म्हणणे अगदी बरोबर असल्याचे जाणवते.)

महेश मांजरेकर यांची एन्ट्री होते. आपल्यामते किशोरी, वीणा, पराग आणि बिचुकले हे या आठवड्यातील स्टार सदस्य असल्याचे महेश मांजरेकर सांगतात.

सुरुवात रुपालीपासून होते, तिने नेहा, पराग आणि शिवानी यांना समजावून सांगण्यासाठी बिचुकले यांना टारगेट केल्याबद्दल महेश रूपालीचा समाचार घेतात. त्यानंतर माधवच्या रागाबद्दल त्याला झापून, पुढे नेहा आणि पराग यांच्यामध्ये झालेल्या गॅसच्या भांडणाचा मुद्दा बाहेर येतो. त्यानंतर शिवानीने आतापर्यंत इतरांच्या केलेल्या अपमानाबद्दल तिला शब्द सांभाळून वापरण्याच्या सूचना दिल्या जातात. वातावरण हलके फुलके करण्यासाठी बिचुकले यांच्या इंग्लिश शब्दांचा एक व्हिडिओ दाखवला जातो, त्यामुळे सर्वांचे मनोरंजन होते.

पुढे अभिजितने त्याच्या कुटुंबाचे फाडलेल्या फोटोंचा मुद्दा येतो. त्यावेळी अभिजित ज्या प्रकारे भावनिक झाला होता, त्यावर महेश मांजरेकर बोलतात. वीणाला वाचवायचे होते तर ड्रामा न करता थेट फोटो फाडायचे, आणि जर इतकच वाईट वाटत असेल, तर वीणाला वाचवायची गरज नव्हती असे महेश म्हणतात.