Border 2: बॉर्डर २ चित्रपटासंदर्भात पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा बॉर्डर २ चित्रपटात झळकणार आहे. सनी देओल आणि वरूण धवन यांच्यानतंर दिलजीत चित्रपटात झळकणार आहे. दिलजीत दोसांझ यांनी सोशल मीडियावर ही अधिकृत माहिती शेअर केली. (हेही वाचा- 'बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन
दिलजीत यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्टवर लिहले आहे की, "पहली गोली दुश्मन चलेगा और आखरी गोली हम! अशा शक्तिशाली संघासोबत उभे राहणे आणि आमच्या सैनिकांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सन्मान आहे! #Border2". शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू निगमनचे प्रसिध्द बॉर्डर यातील गाणे सांदेसे आते है ऐकू येते.
बॉर्डर २ चा नवा प्रोमो
View this post on Instagram
बॉर्डर २ हा चित्रपट जेपी दत्ताच्या 1997 च्या ब्लॉकबस्टर बॉर्डरचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी याला "भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट" म्हणून घोषित केले आहे. बॉर्डर चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली आहे. बॉर्डर चित्रपटात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या सारखे कलाकार होते. चित्रपटात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे चित्रण करण्यात आले होते.