सायशा आणि आर्या (Photo Credit : Youtube)

दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल (Sayesha Saigal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सायशाचे आपल्यापेक्षा तब्बल 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या आर्या (Arya) सोबत लग्न होत आहे. सध्या सायशा 21 वर्षांची असून आर्या 38 वर्षांचा आहे. दक्षिणेतील ‘गजनीकांत’ या चित्रपटात आर्या व सायशा यांनी एकत्र काम केले. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघांचे सुत जुळले, आणि आता या दोघांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 व 10 मार्चला हा विवाहसोहळा हैद्राबाद येथे पार पडेल. त्यानंतर चेन्नई येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे.

सायशा ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. तिने तेलगू चित्रपट ‘अखिल’मधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर आर्या हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता आहे. त्याचे चेन्नईत ‘शी सेल’ नावाचे हॉटेलही आहे. 'कलभा कधलन', 'माय कन्नाडी', 'सर्वम', 'राजा रानी', 'जीवा' हे त्याचे काही लोकप्रिय चित्रपट होय. सायशा आणि आर्या हे आगामी 'काप्पान' या चित्रपटात झळकणार आहेत. गेले एक वर्ष या दोघांचे अफेअर चालू होते, आता या अफेअरची परिणती लग्नात होणार आहे.