
बिग बॉस मराठी सीजन 2 (Bigg Boss Marathi Season 2) चा लोकप्रिय सदस्य अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) याचा जमीन न्यालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता बिचुकले बिग बॉस च्या घरात परत येण्याची आशा मावळली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. बिग बॉस या कार्यक्रमानंतर अभिजित बिचुकले हे फरार होण्याची शक्यता आहे, हे कारण देऊन सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने हा जमीन नाकारला आहे.
अभिजीत बिचुकले यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. हा गुन्हा त्यांच्यावर 7 वर्षांपूर्वी नोंदवला होता. मात्र आज बिचुकले यांनी सर्व आरोप अमान्य केले. त्यानंतर त्यांना बिग बॉसच्या घरात जाण्यास परवानगी दिली तर ते मुंबईमधून परत येणार नाहीत असे न्यायालयाचे म्हणणे ठरले.
(हेही वाचा: अभिजित बिचुकले यांना न्यायालयीन कोठडी; Bigg Boss मधील 'घरवापसी' बद्दल साशंकता कायम
अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून काही ना काही कारणाने चर्चेत राहिले आहेत. प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र अचानक 21 जून रोजी बिचुकले यांना सेटवरून अटक झाली. चेक बाउन्स आणि खंडणी प्रकरणी बिचुकले यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगातही ठेवण्यात आले होते. मात्र तक्रारदाराने तक्रार मागे घेऊनही आता न्यायालयाने त्यांचा जमीन फेटाळला आहे.