Amitabh Bachchan (Photo Credits: Facebook)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रकृतीबद्दल अनेक परस्परविरोधी रिपोर्ट्स सध्या उघडकीस आले आहेत. काही वृत्तसंस्थांच्या मते अमिताभ यांना होत असलेल्या लिव्हरच्या त्रासामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. तर काहींच्या मते या सर्व अफवा आहेत. त्यामुळे त्यांच्या फॅन्सचा गोंधळ झाला आहे.

एका वृत्तसंस्थेच्या मते, अमिताभ बच्चन यांची प्रकृती ढासळल्यामुळे 15 ऑक्टोबरला रात्री 2 वाजता त्यांची नानावटी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आली होती. बच्चन यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना लिव्हरचा त्रास होत आहे, तसेच त्यांना एका 'स्पेशल केबिन' मध्ये ठेवले असून फक्त जवळच्या नातेवाईकांना भेटण्याचीच मुभा देण्यात आलेली आहे, असेही त्या रिपोर्ट मध्ये म्हटले होते.

पण काहीच वेळात दुसऱ्या एका वृत्तसंस्थेकडून या गोष्टीचे खंडन केले जाऊन या सगळ्या अफवा आहेत, असे सांगण्यात आले. तसेच बिग बी फक्त 'रुटीन चेक अप' साठी नानावटीत गेले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असेही नमूद करण्यात आलॆ. गुरुवारी खुद्द बिग बी यांनी 'करवा चौथ'च्या मुहूर्तावर जया बच्चन यांच्या सोबतच एक जुना फोटो शेयर करून या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

अमिताभ बच्चन यांना मनमोहन देसाई यांच्या 'कुली' या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान लिव्हरला दुखापत झाली होती आणि 75 % लिव्हर खराब झाले होते. तेव्हापासून बिग बी ना लिव्हरचा त्रास होतो आहे.  (हेही वाचा. Amitabh Bachchan Birthday Special: सुकन्या मोनेंनी शेअर केली बिग बी यांच्यासोबतची 'ही' खास आठवण)

सध्या बिग बी 'कौन बनेगा करोडपती' या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. तसेच चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना नुकताच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारही जाहीर झाला आहे.