Amitabh Bachchan Birthday Special: सुकन्या मोनेंनी शेअर केली बिग बी यांच्यासोबतची 'ही' खास आठवण (See Photo)

मराठी सिनेसृष्टीतील एक सिनियर अभिनेत्री म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा सुकन्या मोने यांनी देखील अमिताभ यांना वाढदिवशी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यांनी लिहिलेल्या मेसेजचं वैशिष्ट्य म्हणजे सुकन्या यांनी अमिताभ यांच्या सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

Amitabh Bachchan Birthday Special: सुकन्या मोनेंनी शेअर केली बिग बी यांच्यासोबतची 'ही' खास आठवण (See Photo)
Sukanya Mone, Sukanya and Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

बॉलीवूडचे महानायक अशी उपाधी ज्यांना तंतोतंत शोभते अशा अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. आजच्या या स्पेशल दिवशी बिग बींना अनेक बॉलीवूड तसेच देशभरातील त्यांच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील एक सिनियर अभिनेत्री म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा सुकन्या मोने यांनी देखील अमिताभ यांना वाढदिवशी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यांनी लिहिलेल्या मेसेजचं वैशिष्ट्य म्हणजे सुकन्या यांनी अमिताभ यांच्या सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

पहा फोटो,

 

View this post on Instagram

 

'एकापेक्षा एक' सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित श्री.अमिताभ बच्चन ह्यांच्या हस्ते मानचिन्ह घेण्याची संधी मिळाली होती जी आयुष्यभर जतन करून ठेवली आहे.....माझे आदर्श आहेत ते....अखंड बिनातक्रार हसतमुखाने शिस्तबद्ध अविरत काम करत राहणं हे त्यांच्याकडूनच शिकावं....भाषा कशी बोलावी, प्रत्येक भाषेची एक गम्मत आहे, ती त्यांच्याकडून शिकावी,समोरच्याला आदर कसा द्यावा, मग ती व्यक्ती मानाने वयाने कितीही लहान असली तरी....ह्या वयात सुद्धा सतत नवनवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती असणं मग ते वाद्य असो किंवा social media वरच एखादं नवीन app असो , सहकलाकार ला सांभाळून घेणं ....आपल्या वडिलांच्या कविता तोंडपाठ असणं.... कित्ती आणि काय काय म्हणून सांगू..... श्री.अमिताभ बच्चन, आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🌺🌺🌺🙏🙏🙏 @amitabhbachchan 💕💕💕

A post shared by sukanyamone (@sukanyamone9093) on

अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

इतकंच नव्हे तर हा फोटो शेअर करताना सुकन्या यांनी बिग बींसोबतची एक खास आठवण देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'एकापेक्षा एक' या सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित अमिताभ यांनी मानचिन्ह देऊन सुकन्या यांचा सत्कार केला होता. त्याबद्दल त्या लिहितात, "'एकापेक्षा एक' सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित श्री.अमिताभ बच्चन ह्यांच्या हस्ते मानचिन्ह घेण्याची संधी मिळाली होती जी आयुष्यभर जतन करून ठेवली आहे.....माझे आदर्श आहेत ते...."

Amitabh Bachchan Birthday Special: या 5 चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन बनले चित्रपटसृष्टीचे महानायक!

तसेच अमिताभ यांचे कौतुक करत त्या लिहितात, "अखंड बिनातक्रार हसतमुखाने शिस्तबद्ध अविरत काम करत राहणं हे त्यांच्याकडूनच शिकावं....भाषा कशी बोलावी, प्रत्येक भाषेची एक गम्मत आहे, ती त्यांच्याकडून शिकावी,समोरच्याला आदर कसा द्यावा, मग ती व्यक्ती मानाने वयाने कितीही लहान असली तरी....ह्या वयात सुद्धा सतत नवनवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती असणं मग ते वाद्य असो किंवा social media वरच एखादं नवीन app असो , सहकलाकार ला सांभाळून घेणं ....आपल्या वडिलांच्या कविता तोंडपाठ असणं.... कित्ती आणि काय काय म्हणून सांगू..... श्री.अमिताभ बच्चन, आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा"

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2019 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).