अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Amitabh Bachchan And Rekha (Photo Credits: Facebook, Getty)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नेहमीच आपल्या एका पेक्षा एक दमदार भूमिकांसाठी वाहवा मिळवली, अगदी आजही अनेक हौशी कलाकार आपल्याला बिग बी (Big B) एवढं यशस्वी व्हायचंय असे ध्येय ठेवून सिनेसृष्टीत एंट्री घेतात. पण अमिताभ यांच्या फिल्मी करिअर इतकेच त्यांच्याशी निगडित काही गोष्टी देखील प्रसिद्ध आहेत, यातीलच एक म्हणजे अमिताभ आणि रेखा (Rekha) यांचे प्रेमसंबंध. कधीकाळी रुपेरी पडद्यावर आदर्श जोडी म्हणून ओळखले जाणारे हे रिल लाईफ कपल अलीकडे तर एकमेकांच्या समोर येताच आपली वाट वळवून घेतात. इतकंच नव्हे तर काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये तर चक्क अमिताभ यांचा फोटो असलेले पोस्टर पाहून सुद्धा रेखाने तिथून पळ काढला होता. आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी (Amitabh Bachchan Birthday) हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ फोटोग्राफर डब्बु रत्नानी यांच्या कॅलेंडर लाँचिंग कार्यक्रमाच्या दरम्यान शूट झाला होता. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमात डब्बू रत्नानी यांनी क्लिक केलेले बॉलिवूडच्या कलाकारांचे फोटो लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला रेखा सहित अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी मीडियासमोर सर्वच जण पोझ देत होते, त्यानुसार जेव्हा रेखाचा फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा योगायोगाने त्यांच्या मागे अमिताभ यांच्या फोटोचे पोस्टर होते, हे पोस्टर पाहता क्षणीच रेखाने क्षणार्धात आपली जागा बदलली आणि मग दुसरीकडे जाऊन रत्नानी यांच्या मुलासोबत जाऊन फोटो क्लिक केले.

पहा व्हिडीओ

AB aani CD Poster: अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मराठीत; तब्बल 30 वर्षांनतर 'एबी आणि सीडी' मध्ये विक्रम गोखलेंसोबत साकारणार महत्वाची भूमिका (Photo)

दरम्यान हा सर्व प्रकार इतक्या पटकन घडला की कोनाचूही लक्षातही आले नसेल पण त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र रेखा आणि बिग बी यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.