Yami Gautam Pregnant: यामी गौतम होणार आई; लग्नाच्या 3 वर्षांनंतर अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज!
Yami Gautam (PC- Instagram)

Yami Gautam Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे. यामी गौतम आता आई होणार आहे. अभिनेत्री अनेक दिवसांपासून आपल्या चाहत्यांपासून ही बातमी लपवली होती. मात्र, लग्नानंतर आता अभिनेत्री तिच्या आयुष्यातील एक नवीन टप्पा एन्जॉय करत आहे. यामी गौतम प्रेग्नंट असून तिनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे ऐकून तिच्या चाहत्यांनादेखील आनंद झाला आहे. यामी गौतम आणि तिचा चित्रपट निर्माता पती आदित्य धर यांनी आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'आर्टिकल 370' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

आज यामी गौतमचा आगामी चित्रपट 'आर्टिकल 370' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यादरम्यान यामी गौतम पती आदित्य धरसोबत पोहोचली. ट्रेलर लॉन्चसोबतच या जोडप्याने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी शेअर केली. गेल्या अनेक दिवसांपासून यामी गौतमच्या गरोदर असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. या वृत्तांना आता यामी गौतमचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी दुजोरा दिला आहे. (हेही वाचा -Article 370 Trailer: आर्टीकल 370 चा ट्रेलर आऊट, यामी गौतमी देणार दहशतवाद्यांशी लढा)

आदित्यने जेव्हा यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली तेव्हा यामी हसतमुख आणि लाजताना दिसली. यामी आणि आदित्यचे 2021 मध्ये लग्न केले. हे जोडपे लवकरच आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्याच्या तयारीत आहे. आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' चित्रपटाचे वर्णन 'कौटुंबिक प्रकरण' असे केले आहे.

ट्रेलर लॉन्चदरम्यान आदित्य धरने पत्नी यामीचे कौतुक केले. त्याचबरोबर यामीनेही आदित्यचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. यावेळी यामीने सांगितले की, आदित्य शूटिंगदरम्यान प्रत्येकवेळी तिच्यासोबत राहिला आणि त्याने मला पूर्ण पाठिंबा दिला.