Weight Loss Tips: अभिनेत्री समीरा रेड्डी ने शेअर केल्या आहेत वजन कमी करण्यासाठी काही  खास टिप्स, तुम्ही ही घेऊ शकता Inspiration
Sameera Reddy (Photo Credit: Instagram)

आज काल अनेक लोक सोशल मीडिया वर आपल्या फॅट टू फिट ट्रांसफरमेशन च्या स्टोरी शेअर करताना दिसत आहे. आता या यादीमध्ये अभिनेत्री समीरा रेड्डी हीचे ही नाव जोडले गेले आहे. अभिनेत्री समीरा रेड्डीने सोशल मिडियावर तिच्या वजन कमी झाल्याबद्दल काही अपडेट्स शेअर केल्या आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत वाढलेले वजन कमी करण्याचे तिने ठरवले आहे. समीराने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्या पैकी एका फोटोत ती जाडी आणि दुसऱ्या फोटोमध्ये सडपातळ दिसत आहे. (अंकिता लोखंडे ने शेअर केला Workout Video; अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहते दंग ) 

यासह कॅप्शनमध्ये तिने लिहिले की,  'फोटो इतके भ्रामक असू शकतात.या फिटनेसफ्राइडे ला मी स्वतः ला आठवण करू देऊ इच्छिते की, आपण जे पहाता ते खरोखर सत्य होत नाही .हो , मी वर्कआउट करत आहे आणि मला त्याचे परिणाम ही दिसत आहेत. परंतु अद्याप माझे पोट आहे आणि त्यावर जास्त चरबी आहे, जी काही महिन्यात कमी होईल. जेव्हा मी वास्तविक शरीर किंवा फोटो पाहते तेव्हा मला प्रेरणा मिळते . हेच आहे माझे हॅशटॅग फिटनेसमोटिव्हेशन आणि म्हणूनच मी अधिक मेहनत करते. अपडेट हे आहे की माझा हा आठवडा चांगला गेला''.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

 

फॉलोअर्स सह आपली वेट लॉस रेसिपी शेअर करताना अभिनेत्री ने लिहिले आहे की, ''एकूणच मी काही इंच कमी केले आहे आणि हे अधून मधून उपवास, साखर नियंत्रण आणि आठवड्यातून चार वेळा योग आणि बॅडमिंटनमुळे हे शक्य झाले आहे . मला आशा आहे की मी असे करणे सुरूच ठेवेल. आणि मला असे वाटते की मी हे माझे दिवाळी पर्यंतचे ध्येय बनवले पाहीजे. तुम्हाला काय वाटतं? हॅशटॅगलेट्सडूदिस हॅशटॅगसोशलमीडिया वर्सेस हॅशटॅगरिएलिटी.”