अंकिता लोखंडे ने शेअर केला Workout Video; अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहते दंग
Ankita Lokhande (Photo Credit: Instagram)

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर कमबॅक केले. सोशल मीडियावरील छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा सक्रीय झालेल्या अंकिताचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अंकिताने आज एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ (Workout Video) शेअर करत तिने चाहत्यांना फिटनेससाठी मोटीव्हेट केले आहे.

वर्कआऊट व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, "विकेंडसाठी मी तयार आहे. तुम्ही?" तसंच आपल्या ट्रेनरला टॅग करत तिने पुढे लिहिले, "थोडी तरी दया दाखव." (Sushant Singh Rajput Case: अंकिता लोखंडे हिने First Kiss गाण्यावर बनवला व्हिडिओ, सुशांत राजपूत च्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताचा हा फिटनेस चाहत्यांना दंग करणारा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. सुशांत सिंह राजपूत याच्या स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर कमबॅक केले. त्यानंतर पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त देखील तिने त्याच्या सोबतच्या काही आठवणी व्हिडिओद्वारे शेअर केल्या होत्या. (Sushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी 'फिर मिलेंगे' म्हणत Ankita Lokhande ने शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा व्हिडिओ, Watch Here)

'पवित्र रिश्ता' च्या दुसऱ्या सीजनमधून अंकिता लोखंडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पुन्हा एकदा अर्चना साकारणाऱ्या अंकितासोबत अभिनेता शहीर शेख मानवची भूमिका साकारणार आहे.