Sushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी 'फिर मिलेंगे' म्हणत Ankita Lokhande ने शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा व्हिडिओ (Watch Here)
Sushant Singh Rajput & Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा आज पहिला स्मृतीदिन आहे. 14 जून 2020 मध्ये सुशांतने जगाचा निरोप घेतला. आज त्याच्या पुण्यतिथीनिमित्त चाहत्यांकडून पुन्हा एकदा त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्याच्या नावाचे हॅशटॅग्स ट्रेंड होत असून त्याला न्याय देण्याची मागणी चाहते करत आहेत. इतकंच नाही अनेक सेलिब्रिटींनी देखील पोस्ट करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील सुशांतच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अंकिताने शेअर केलेला व्हिडिओ 4.30 मिनिटांचा असून तिने पोस्टमध्ये म्हटले की, "हा आमचा प्रवास. फरत भेटूया..." त्याचबरोबर 14 जून लिहित हार्टब्रेक वाली इमोजीही पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता-सुशांत यांच्या खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. (Sushant Singh Rajput च्या पहिल्या स्मृतीदिनी Pulkit Samrat, Kriti Sanon यांच्या भावूक पोस्ट)

अंकिता लोखंडे पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

त्याचबरोबर अंकिताने दिवाळी 2011 चा एक सुशांत सोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती सुशांत सोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "तुझ्यावर सदैव प्रेम असेल."

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताच्या या व्हिडिओवर लाखो चाहत्यांच्या प्रतिक्रीया देत असून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान, अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला होता. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या पुण्यतिथीच्या एका दिवसआधी तिने पुन्हा सोशल मीडियावर कमबॅक केलं आहे.