Neerav Modi Biopic: डिजिटल मीडियाची (Digital Media) लाट आज जगभरात इतक्या वेगाने पसरतेय की सगळ्याच क्षेत्रांना यामध्ये व्यापून घेतलं जातंय,फिल्म इंडस्ट्रीचा देखील यामध्ये मोठा फायदा होताना दिसून येतो. वादात्मक विषय मांडलेल्या ज्या सिनेमांना सेन्सर बोर्डची (Censor Board) बंधन पाहता कात्री लावायला लागायची तेच विषय आता वेब सीरिजच्या(Web Series) रूपात इंटरनेट वरच रिलीज करण्याचा मार्ग चित्रपट निर्मात्यांनी स्वीकारला आहे. अशातच अलीकडे प्रसिद्ध व वादातीत जीवन असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपीक (Biopic) बनवण्याकडे अधिक कल पाहायला मिळतोय.सूत्रांच्या माहिती नुसार आता राजकारणी, खेळाडू, फिल्मस्टार्स यांच्या पाठोपाठ घोटाळेबाज नीरव मोदी (Neerav Modi) याच्या आयुष्यावर देखील एक बायोपिक वेब सीरीजच्या रूपात लवकरच बनवणार असल्याचे सांगितलं जातंय.
पंजाब नॅशनल बँकेचा (Punjab National Bank) जवळपास 13,700 कोटी रुपयांचा घोटाळा करून देशातून काढता पाय घेतलेल्या नीरव मोदीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. एका प्रख्यात डिजिटल प्लॅटफॉर्म साठी हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याचे पीपिंग मुन च्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे. PM Narendra Modi Biopic: सुप्रीम कोर्टाने फेटाळली निर्मात्यांची याचिका; 19 मे नंतर होणार प्रदर्शित
या वेब सीरिजची निर्मिती व दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर करणार आहेत. आजवर अनेक सेलिब्रिटींचे पोर्टफोलिओ शूट केलेल्या या फोटोग्राफरचं नाव मात्र तूर्तास गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. या वेब सीरिजचं कथानक 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' या बायोपिक सारखे असून यात एक प्रसिद्ध हिरा व्यापारी म्हणून यश संपादन केलेल्या नीरव मोदीने कशा प्रकारे बँका व गुंतवणूकदारांना फसवलं हे पाहायला मिळणार आहे.या सीरिजच्या चित्रीकरणासाठी सध्या या टीम तर्फे लंडन मध्ये जागा तपासली जातेय व पुढच्या काही आठवड्यातच याचे शूटिंग सुरु होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी याच्यावर युके मध्ये पैशाच्या अवैध उलाढालींसाठी 2 बिलियन डॉलर्सची कारवाई सुरु आहे.