विशाल ददलानी (Image Credit: Facebook)

बॉलिवूड संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी (Vishal Dadlani) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. प्रत्येक मुद्द्यावर ते आपली मते बिनधास्त मांडतात. ते सध्याच्या सरकारचे कट्टर विरोधी मानले जातात. विशाल ददलानी त्यांच्या एका विधानामुळे नेटीझन्सच्या निशाण्यावर सापडले आहेत. वास्तविक, इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वामध्ये सर्व गायक देशभक्तीपर गाणी गाताना दिसले. यावेळी एका गायकाने लता मंगेशकर यांचे ऑल टाईम हिट ठरलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ गाणं गायलं. हे गाणं ऐकल्यानंतर विशाल ददलानी यांनी त्यांचं कौतुक केलं. परंतु, या दरम्यान त्यांनी गाण्याविषयी चुकीची माहिती दिली. ते म्हणाले की, हे गाणं स्वातंत्र्याच्या वेळी लता मंगेशकर यांनी गायले होते. हे गाणं ऐकल्यानंतर पंतप्रधान नेहरू भावूक झाले होते. या माहितीमुळे त्यांना आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

विशाल ददलानी यांना त्यांच्या या वक्तव्यावरून नेटीझन्स ट्रोल करत आहेत. कारण, हे गाणे स्वातंत्र्याच्या वेळी नव्हे तर 1962 मध्ये लता मंगेशकर यांनी गायले होते. या चुकीच्या माहितीमुळे ते सर्वांच्या निशाण्यावर आले आहेत. माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनीही विशाल ददलानी यांना फटकारले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'हे आहेत संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी. त्यांना इतिहास, संगीत आणि भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी फारचं कमी माहिती आहे.' (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांचे मोठ्या थाटामाटात झाले 'शुभमंगल सावधान', See Pics)

स्वराज कौशल यांचे ट्विट - 

नेटीझन्स ट्विट -

विशाल ददलानी ट्विट - 

तथापि, या चुकीबद्दल जाणून घेत विशाल ददलानी यांनी स्वत: माफी मागितली आहे. विशाल ददलानी हे भाजपा पक्षाचे कट्टर विरोधक आहेत. तसेच ते आम आदमी पक्षाचे समर्थक आहेत. सध्या नेटीझन्स त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत.