Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांचे मोठ्या थाटामाटात झाले 'शुभमंगल सावधान', See Pics
Varun Dhawan-Natasha Dalal Wedding (Photo Credits: Instagram)

अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवन (Varun Dhawan) नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) हिच्या सोबत वरुणने अलिबागमध्ये लग्न केले आहे. वरुण आणि नताशा चे लग्न हे 2021 मधील बॉलिवूडच्या शाही लग्नसोहळ्यापैकी एक होते. त्यामुळे या लग्नाची चर्चा देखील बरीच होती. कोरोना व्हायरसच्या नियमांचे पालन करुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हे लग्न अलिबागच्या 'The Mansion House' येथे पार पडले. या लग्नाचे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या लग्नाचे आपण साक्षीदार व्हावे अशी इच्छा कोणाची नसणार. मात्र आपल्या चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण केलंय नवविवाहित वरुण धवननेच. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या लग्नाचे फोटोज शेअर करुन चाहत्यांची ही उत्कंठा संपवली आहे.हेदेखील वाचा- Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: नताशा दलाल कोण आहे? जिच्याशी वरुण धवन घेणार आहे सात फेरे

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन आणि नताशा दलाला सात फेरे घेताना आणि लग्न झाल्यावर नवविवाहित दाम्पत्यावर फुलांचा वर्षाव होताना या फोटोजमध्ये दिसत आहे.

या लग्नाला आलिया भट, मनिष मल्होत्रा, करण जौहरसह अनेक दिग्गज मंडळी या लग्नाला उपस्थित होते. गेले 4 दिवस हा शानदार लग्नसोहळा रंगला होता. यात संगीत सेरेमनी पासून हळदी सेरेमनीपर्यंतचे सर्व फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

या लग्नाचा मंडप आणि त्याचे डेकोरेशन अक्षरश: डोळे दिपवून टाकणारे आहे. अनेक विघ्न पार करत आज हे लग्न अखेर पार पडले. कारण लग्नाच्या दिवशीच शनिवारी रात्री वरुण धवनच्या कारचा छोटा अपघात झाला होता. मात्र सुदैवाने यात वरुणला काही दुखापत झाली नाही. मात्र अखेर वरुण आणि नताशा यांनी आपल्या गेल्या कित्येक वर्षांच्या नात्याला आज एक नाव देत लग्नाच्या गाठीत कायमचे बांधले गेले. नताशा आणि वरुणची पहिली भेट सहावीत असताना झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री ज्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.