Salman Khan च्या सीटी मार गाण्यावर डॉक्टरांचा जबरदस्त डान्स, Disha Patani हिने शेअर केला व्हिडिओ
Salman Khan & Disha Patani (Photo Credits: Twitter)

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट राधे- मोस्ट वॉन्डेट भाई (Radhe: The Most Wanted Bhai) झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. परदेशात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला क्रिटीस पासून मिक्स रिव्ह्यू मिळत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. परंतु, सीटी मार (Seeti Maar) या गाण्याला मोठी पसंती दर्शवली जात आहे. या गाण्यात सलमान आणि दिशा पटानीच्या (Disha Patani) केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कोरोना योद्धा डॉक्टर्स सीटी मार या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत.

नुकतीच दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिने लिहले आहे की, वाह! काय उर्जा आहे! सीटी मार गाण्यावर डॉक्टर्स डॉक्टर्स डान्स करत आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध लढा कोणालाही सोपा नसतो. अशा प्रकारे, स्वत: ला आनंदी आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग देखील उत्कृष्ट आहे. आपण हा खास व्हिडिओ देखील पाहू शकता. हे देखील वाचा- मुंबई पुणे एक्सप्रेस वर काही दिवसांपूर्वी अभिनेता योगेश सोहनीला लुटणारा आरोपी 2 दिवसांत गजाआड

फोटो-

सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी 4.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.