मुंबई पुणे एक्सप्रेस वर काही दिवसांपूर्वी अभिनेता योगेश सोहनीला लुटणारा आरोपी 2 दिवसांत गजाआड
योगेश सोहनी । Photo Credits: Instagram

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai Pune Express Highway) वर प्रवाशांची लूट होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 2 दिवसांपूर्वी अभिनेता योगेश सोहनी (Yogesh Sohani) देखील अडकला होता. योगेशला हिप्नोटाईज करून त्याच्याकडून 50 हजार लूटल्याची घटना समोर आली होती. पण 2 दिवसांतच पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला पकडून गजाआड टाकले आहे. योगेश सोहनीने स्वतः याची माहिती देत पोलिसांचे आणि आरोपीला पकडण्यास मदत करणार्‍या इतर सार्‍‍यांचे आभार मानले आहेत. पिंपरी-चिंचवड या भागाचे पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश (Krushna Prakash) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देखील योगेशने आभार मानले आहेत.

दरम्यान योगेशने इंस्टाग्राम वर एका व्हिडिओच्या माध्यमातून सारी हकीकत सांगितली आहे. यावेळेस त्याने मुंबई-पुणे प्रवास करताना सावध राहण्याचे देखील नागरिकांना आवाहन केले आहे. याआधी देखील अनेक प्रवाशांनी मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांची लूट होत असल्याची, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडलं जात असल्याची तक्रार आहे. 8 मे ला घडलेल्या गुन्ह्यांची तात्काळ पोलिसांनी दखल घेतली. विविध टीम्सने एकत्र येऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे.

योगेश सोहनी व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Yogesh Sohoni | Actor (@yogeshsohoni)

पिंपरी-चिंचवड या भागाचे पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश देखील मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहेत. त्यांनी मागील आठवड्यातच रात्रीच्या वेळेस वेषांतर करून विविध पोलिस स्थानकांना भेटी देऊन सामान्य लोकांसोबत पोलिस कसे वागतात याचा आढावा घेतला होता. (नक्की वाचा: 'हा FASTag नाही, SLOWTag होतोय' असे सांगत गीतकार संदिप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितलेला आपल्याला आलेला वाईट अनुभव, Watch Video).

योगेश सोहनी‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून सध्या रसिकांच्या भेटीला येत आहे. शौनक ही मुख्य भूमिका तो मालिकेत साकारत आहे.