अभिनेता विकी कौशल ने शेअर केलेला गोंडस चिमुरड्याचा फोटो सोशल मिडियावर होतोय व्हायरल, काय आहे या फोटोमागचे सत्य
Vicky Kaushal (Photo Credits: Instagram)

'Where is the Josh'असं म्हणत घराघरात पोहोचलेला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. विकी नेहमीचा सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याने नुकताच एका गोंडस चिमुरड्याचा फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटोमधील गोंडस बाळ पाहून सर्वच बाळाचे कौतुक करत आहे. हा गोंडस चिमुरडा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द विकी कौशलच आहे हे कळताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

या फोटोखाली विकीने 'फ्रिज पोटॅटो' (Fridge Potato)असे कॅप्शन दिले आहे. कारण विकीचा हा लहानपणीच्या फोटोमध्ये विकी एका फ्रिजमध्ये अगदी थाटात बसलेला दिसत आहे.

विकी कौशल फोटो:

 

View this post on Instagram

 

Fridge potato. Circa ‘88.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

त्याचा हा फोटो आणि त्याखाली लिहिलेले कॅप्शन वाचून, मला पण लहानपणापासून बटाटा आवडतो, Chubby cheek, potato in the fridge 😋be my potato, i will be your fries, असे अनेक गमतीशीर कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

'रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' यांसारख्या चित्रपटात स्वत:च्या अभिनयाचे वेगवेगले पैलू लोकांसमोर मांडण्यास हा पट्ठ्या यशस्वी ठरला आहे. यातील भूमिका पाहून प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

हेही वाचा- 'Bhoot: Part One - The Haunted Ship' फर्स्ट लूक रिलीज, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता विक्की कौशलला पडले होते 13 टाके

विकी सध्या त्याच्या उधम सिंग या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दिग्दर्शक शूरजित सरकारच्या सरदार उधम सिंगमध्ये त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. त्याचबरोबर ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’चित्रपटाचे अनेक भाग येणार आहेत. यातला पहिला भाग ‘भूत- द हाँटेड शिप’ 15 नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत करणच्या धर्मा प्रोडक्शनने अनेक रोमँटीक चित्रपटांची निर्मिती केली आहे.