लगीनघाई! अभिनेता वरुण धवन लवकरच बोहल्यावर चढणार?
वरुण धवन आणि नताशा दलाल (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

2018 मध्ये बॉलिवूडमध्ये लग्नसराईची धूम सुरु होती. त्यावेळी सोनम कपूर, प्रियांका-निक आणि दीपवीर यांनी लग्नगाठ बांधली होती. तर आता बॉलिवूड प्रेमी त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या लगीनघाईची वाट पाहत आहेत. त्यातील प्रामुख्याने अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या विवाहाच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. येत्या काही महिन्यात वरुण आणि नताशा लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा हिच्यासह विवाहबंधनात अडकणार आहे. तर नताशा हिने लग्नसराईसाठी लग्नासंबंधित खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी वरुण आणि नताशा नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते.

 

View this post on Instagram

 

Happy diwali 👷‍♂️👩🏻‍⚕️

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

नताशा लग्नासाठीचे कपडे, डेकोरेशन आणि फूलांची खरेदी करत आहे. तर नताशा ही स्वत: फॅशन डिझायनर असून ती लग्नासाठी ब्रायडल ड्रेस स्वत:च डिझाईन करणार असल्याची शक्यता आहे. तर काही मिडिया रिपोर्ट्सुनार नताशा लग्नासंबंधित छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने लक्ष देत आहे.

'कॉफी विथ करण' या शोमध्ये वरुण धवनने नाताशा दलाल सोबतच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा केला होता. तसेच लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे करण जोहरच्या शोमध्ये सांगितले होते. तर नाताशी हिला सामान्य आयुष्य जगण्यात खूप आनंद वाटतो असा खुसाला वरुण धवन याने केला होता.