खतरनाक! 2.0 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2.0 चित्रपट ( फोटो सौजन्य- ट्विटर)
बॉलिवूडमध्ये आजवर प्रेक्षक वाट पाहत असलेल्या बहुचर्चित  2.0 या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच रजनीकांत यांचा यापूर्वीचा चित्रपट रोबोट याचा हा पुढील खतरनाक सिक्वल असावा असा या चित्रपचा ट्रेलर आहे.
बहुप्रतिक्षित 2.0 या चित्रपटात रजीकांत सोबत अक्षय कुमारही एका तगडी भूमिका साकारताना दिसून आला आहे. तर या ट्रेलरच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसतो. मात्र अचानक देशातील सर्व मोबाईल उडून जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे एका भयानक युद्धाची सुरुवात होऊन ज्या चिट्टी नावाच्या रोबोटची मदत घेतली जाते तो म्हणजेच "2.0"

तसेच हा चित्रपटात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्रपट पाहावयास गुंग करुन ठेवेल अशा पद्धतीने केले आहे. तर यामध्ये अक्षय कुमार हा नकारात्मक भूमिका साकारताना दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता संपूर्ण चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.