Bikini Top घालून बाहेर फिरण्यासाठी निघाली तारा सुतारिया, शर्ट घालण्यास विसरली काय? अशा शब्दात केले ट्रोल
तारा सुतारिया (Photo Credits-Instagram)

अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) हिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करु शकले नाही. पण सोशल मीडियात तिच्या लूकची जोरदार चर्चा नेहमीच सुरु असते. सध्या तारा हिच्याकडे तीन सिनेमे असून त्याची ती तयारी करत आहे. मात्र आता असे काही झाले की, बॉलिवूड मधील सर्वाधिक हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ताराला आता सोशल मीडियात ट्रोल केले जाऊ लागले आहे.(Poonam Pandey हिने सांगितला Pronography आणि Nudity मधील फरक, मंदिरातील मूर्तीचे दिले उदाहरण)

नुकत्याच मुंबईतील एका पपराजीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये तारा हिला कैद केले होते. या दरम्यान, तारा हिने रिप्ड जिन्ससह निळ्या रंगाचे ब्रालेट म्हणजेच बिकनी टॉप घातला होता. चेहऱ्यावर मेकअप सुद्धा दिसून येत नव्हता. हेच फोटो पपाराजीने अकाउंटवर शेअर केल्यानंतर तिला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजर्सने लिहिले आहे की,तिला कोणीतरी कपडे द्या. तिच्या ड्रेस सेंसवर आता प्रश्न उपस्थितीत केले जाऊ लागले आहे.

विरल भयानी याच्या अकाउंटवर एका युजर्सने लिहिले की, बिकनी टॉप हे कॅज्युअल टॉपच्या जागी घातले गेले आहे. वाह काय फॅशन आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, मला तर असे वाटते मॅम शर्ट घालण्यास विसरल्या वाटतं? सोशल मीडिया अशा विविध कमेंट्स तिला तिच्या कपड्यांवरुन केल्या गेल्या आहेत.(Priya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तारा हिच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा 'तडप' मध्ये ती मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. तसेच हा सिनेमा सप्टेंबर महिन्यापूर्वी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत तारा ही टायगर श्रॉफ सोबत 'हिरोपंती 2' मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी सुद्धा असणार आहे.