Priya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर
Priya Ahuja (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी फेसबूकवर स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा समाचार घेणारी पोस्ट लिहिली होती. तिच्या या पोस्टला कलाकरांप्रमाणेच राजकीय महिला नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता. हेमांगी कवीच्या पोस्टला महिनाही उलटला नाही. यातच 'तारक मेहता का उलटा चष्मा' या कार्यक्रमात रिटा रिपोर्टरची भूमिक साकरणारी प्रिया आहुजाने (Priya Ahuja) एका फोटोत ब्रा स्ट्रॅप (Bra Strap) दाखवल्याने काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. अनेक नेटकऱ्यांनी प्रियांच्या या फोटोला नापसंती दर्शवली होती. तर, काही युजर्सनी खालची पातळी गाठत प्रियाने तिचे स्तन दाखवावे असे म्हंटले होते. यावर प्रिया आहुजाने आपले मत मांडले असून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रिया आहुजाने नुकतीच फ्री प्रेस जनरला मुलाखत दिली आहे. या मुलाखातीत तिने ब्रा स्ट्रॅपवरून टोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोत वादग्रस्त असे काहीही नसल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय, ट्रोलिंग आणि मॅसेजचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. जर, एखाद्या सेलिब्रिटीने केलेली पोस्ट पटत नसेल तर, युजर्सने त्या सेलिब्रेटीला अनफॉलो करावे, असाही सल्ला तिने नेटकऱ्यांना दिला आहे. हे देखील वाचा- The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)

प्रिया आहुजाची इंस्टाग्राम पोस्ट-

अभिनेत्री प्रिया आहुजा फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रिया अहुजा मालिकेपासून दूर आहे. प्रेग्नंसीमुळे प्रियाने मालिकेपासून दूर राहणे पसंत केले आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.