
पोर्नोग्राफी प्रकरणात (Pronography Case) अटक झालेल्या शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राच्या अटकेपासून प्रोनोग्राफी (Pronography) आणि न्युडिटी (Nudity) संदर्भात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मॉडेल पूनम पांडेनेही (Poonam Pandey) पोर्नोग्राफी आणि न्युडिटीबाबत आपले मत चाहत्यांसमोर ठेवले आहे. पूनम पांडेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पोर्नोग्राफी आणि न्युडिटी विषयी बोलताना दिसत आहे. न्युडिटी ही एक कला आहे आणि पोर्नोग्राफीच्या श्रेणीत येत नाहीत, हे सांगताना पूनम पांडेने मंदिरातील मूर्तीचे उदाहरण दिले आहे.
पूनम पांडे या व्हिडिओत म्हटले आहे की, मला यावेळी बरेच मेसेजेस येत आहेत. ज्यात बहुतेक लोक पॉर्नोग्राफी आणि इरोटिका परिभाषित करण्यास सांगत आहेत. मी हे परिभाषित करण्यास पुरेसे सक्षम नाही. पंरतु, माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही वेगळे आहे. कारण, मी स्वत: न्यूड फोटो शूट केले आहेत. न्युडिटीबाबत बोलायचे झाले तर, आपल्याला पुस्तकांच्या दुकानात कामसूत्रांची कोणतीही पुस्तके खरेदी करता येऊ शकतात. हे देखील वाचा- Raj Kundra Pornography Case: अश्लील व्हिडिओ प्रकरणातील राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
तसेच, 70 च्या दशकात एमएफ हुसेन नग्न पेन्टिंग्ज बनवायचे. या पेन्टिंगला कलेचे स्वरूप मानले जात होते. आपल्या येथे मंदिरामध्ये तमाम सुंदर स्थान आहेत, जिथे नग्न मूर्ती दिसतात. ही एक प्रकारची कला आहे आणि सौंदर्याच्या श्रेणीत येते. तिच्याकडे नेहमी कला म्हणूनच पाहिले पाहिजे, असेही पूनम म्हणाली आहे.
महत्वाचे म्हणजे, राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेने त्याच्या अनेक आरोप केले आहेत. मात्र, आता तिने पोर्नोग्राफी आणि न्युडिटीबाबत तिचे मत मांडले आहे.