स्वरा भास्करचा 'मुल' दत्तक घेण्याचा निर्णय, आता आणखी वाट पाहवत नाही!
Swara Bhaskar (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांसाठी तर कधी तिच्या वक्तव्यामुळे. स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यास ती मागेपुढे पाहत नाही, ज्यामुळे ती अनेकदा अडचणीत येते. सिंगलहुड एन्जॉय करत असलेल्या स्वराने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वराने एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिला आई व्हायचे आहे, त्यासाठी तिने कायदेशीर प्रक्रियेसाठी अर्जही केला आहे. एका मुलाखतीत स्वराने मूल दत्तक घेतल्याची माहिती दिली आहे. मिड डेशी संवाद साधताना स्वराने सांगितले की, तिने केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि ती सध्या ती प्रतीक्षा यादीत आहे.

स्वरा म्हणते की, मला नेहमीच कुटुंब आणि मुले हवी होती. मला समजले की मूल दत्तक घेणे हा एक सोपा मार्ग आहे. मी भाग्यवान आहे की भारतात, राज्यांमध्ये एका मातेला मूल दत्तक घेण्याची परवानगी आहे. मी अनेक जोडप्यांना भेटली आहे ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत आणि दत्तक घेतलेल्या आणि आता प्रौढ झालेल्या मुलांना मी त्यांना भेटली आहे. (हे ही वाचा ‘बिग बॉस 15’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभिजीत बिचुकलेंना झाला कोरोना, घरात होणार 'या' खास व्यक्तीची एंट्री.)

स्वराच्या या निर्णयाला तिचे आई-वडील पाठिंबा देत आहेत. ते म्हणते की, मी CARA च्या माध्यमातून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मला माहित आहे की हा वेळ खूप मोठा आहे, जवळजवळ तीन वर्षे. परंतु मी दत्तक घेऊन पालक होण्याची अजुन प्रतीक्षा करू शकत नाही.

कामाच्या आघाडीवर, स्वरा भास्करला नुकताच शीर कोरमा या लघुपटातील तिच्या सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात दिव्या दत्ता, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार दिसले आहेत. याचे दिग्दर्शन फराज आरिफ यांनी केले आहे. सध्या ती तिच्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.