सुशांत सिंह राजपूत याचा 'दिल बेचारा' सिनेमा IMDb रॅंकिंगवर अव्वल; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद (View Tweets)
Sushant Singh Rajput's Last Film Dil Bechara (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) 24 जुलै रोजी डिजनी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शनानंतर चाहते, समीक्षक आणि बॉलिवूड कलाकरांकडून या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळत आहे. हा सिनेमा सुशांतच्या चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. दिल बेचारा या सिनेमा सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर चाहत्यांना भावूक केले आहे. सिनेमा प्रदर्शनानंतर काही तासांतच या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत या सिनेमाला IMDB रॅंकिंग 10/10 मिळाले. सध्या रँकिंग 9.8 इतके आहे. इतर बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत हे रॅकिंग अव्वल आहे. (Dil Bechara Full Movie Leaked Online By Tamilrockers: सुशांत सिंह राजपूत च्या दिल बेचारा सिनेमावर पायरसीचे ग्रहण)

दिल बेचारा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री संजना संघी देखील सुशांतच्या आठवणीत भावूक झाली आहे. संजना संघी या सिनेमात प्रमुख भूमिका असून हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. स्क्रीप्ट न वाचताच केवळ मैत्रीखातर सुशांतने हा सिनेमा केल्याचे सिनेमाचे दिग्दर्शक आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबड़ा यांनी सांगितले आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावा लागला. दरम्यान, सुशांतच्या चाहत्यांनी आयएमडीबीवर टॉप रॅंकिंग देत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

पहा ट्विट:

सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली असून सिनेमाचे डायलॉग्स सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. त्याचबरोबर सुशांतच्या चाहत्यांनी भावूक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रीया:

सिनेमाला मिळणारे प्रचंड प्रेम पाहता हे सर्व अनुभवण्यासाठी सुशांत आता या जगात हवा होता, अशी चाहत्यांची इच्छा आहे. या सिनेमातील सुशांतचा अभिनय सर्वांनाच भावला आहे. तर सिनेमात सुशांतच्या तोंडी असणारे डायलॉग आणि त्याची स्माईल यावर पुन्हा एकदा चाहते फिदा झाले आहेत.