Sushant Singh Rajput Death Case: सुशांत च्या मृत्यूप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर आता सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना NCB कडून चौकशीसाठी समन्स धाडण्यात येणार
श्रद्धा कपूर आणि सारा अली खान (Photo Credits-Instagram)

Sushant Singh Rajput Death Case:  बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अद्याप तपास आणि चौकशी सुरुच आहे. तर तपासात दिवसागणिक नव्याने खुलाने होत गेल्याने त्याला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर काही जणांना NCB कडून अटक करण्यात आले. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह सॅम्युअल मिरांडा यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. तर रिया हिने ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीकडून (NCB) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांना चौकशीसाठी समन्स धाडण्यात येणार आहेत.(Sushant Singh Rajput Case चा अंतिम वैद्यकीय रिपोर्ट फॉरेन्सिक टीम पुढील आठवड्यात CBI कडे सुपूर्त करणार; AIIMS च्या फॉरेन्सिक प्रमुखांची माहिती)

सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीच्या चौकशीला या आठवड्यात सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार आता या दोघींना समन्स पाठवले जाणार आहेत. यापूर्वी ड्र्ग्जमध्ये रकुल प्रित सिंह हिचे सुद्धा नाव असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले होते. सुशांतच्या मृत्यू मागील गुढ अद्याप कायम आहे. पण ड्रग्जचे वळण लागल्यानंतर मुंबईतून या संबंधित काही जणांना एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची तुरुंगात पाठवणी केली आहे.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत ची बहिण मीतू ने आपल्या आई-भावाचा एक सुंदर चित्र पोस्ट करुन म्हणाली 'माझा भाऊ माझा गर्व होता')

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतअवस्थेत आढळला होता. त्यानंतर कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप करत पटना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मुंबई-पटना पोलिसांच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. त्यानंतर ड्रग्सच्या अनुषंगाने होणार तपास NCB करत आहे.