Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या जाण्याने त्याच्या कुटूंबियांसहित त्याचा चाहत्यांना जबर धक्का बसला. त्याला विसरणे हे या सर्वांसाठी खूपच अवघड जात आहे हे एकूणच सद्य परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. यातच त्याच्या आठवणीत सुशांतची बहिण मीतू सिंह (Meetu Singh) हिने आपल्या आई आणि भावाचे एक सुंदर चित्र सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. या फोटोला मीतूने एक सुदंर कॅप्शन लिहिले आहे. ज्यात तिने म्हटले आहे की 'माझा भाऊ माझा गर्व होता'.

मीतू सिंह ने ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सुशांत आपल्या आईसमोर गुडघे टेकून हात जोडून तिच्याकडे आशीर्वाद मागत आहे. Sushant Singh Rajput Wax Statue: पश्चिम बंगालमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा पहिला मेणाचा पुतळा तयार

 My mother was my source of energy.

My bhai was my pride.

Lost both of them too early.

Unable to cope up with this heart-wrenching loss. pic.twitter.com/bhHqiogr3m

या फोटोखाली 'माझी आई माझी ऊर्जा होती. माझा भाऊ माझा गर्व होता. मी त्या दोघांनाही खूप लवकर गमावले. मी हृदय हेलावून टाकणारे हे दु:ख मी सहन करू शकत नाहीय.' असे मीतू सिंह ने म्हटले आहे. मीतूचे हे पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. तर सुशांतच्या चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्सच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुशांतने अगदी वयाच्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 14 जूनला सुशांत त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. सध्या CBI, NCB आणि बिहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.