Sushant Singh Rajput Wax Statue: पश्चिम बंगालमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा पहिला मेणाचा पुतळा तयार
Sushant Singh Rajput Wax Statue (PC- ANI)

Sushant Singh Rajput Wax Statue: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन चार महिन्यांचा काळावधी उलटला आहे. परंतु, अद्याप सुशांतचे चाहते त्याच्या आत्महत्येचा धक्का विसरू शकलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. अशातचं आता पश्चिम बंगालमध्ये सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा बनवण्यात (Sushant Singh Rajput Wax Statue) आला आहे.

सध्या सोशल मीडियावर या पुतळ्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. पश्चिम बंगालमधील एका संग्रहालयात हा पुतळा ठेवण्यात आला आहे. आसनसोल येथील शिल्पकार सुकंतो रॉय (Sukanto Roy) यांनी हा पुतळा बनवला आहे. (हेही वाचा -PM Modi Wishes Virat Kohli-Anushka Sharma: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना गोड बातमीबद्दल पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा (View Tweet))

यासंदर्भात सुकंतो रॉय म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत हा माझा आवडता अभिनेता होता. सुशांतच्या मृत्यूची प्रचंड खंत जाणवत आहे. मी हा पुतळा माझ्या संग्रहालयासाठी बनवला आहे. तथापि, सुशांतच्या कुटुंबियांनी मला त्याचा पुतळा तयार करण्याची विनंती केली तर, मी नवीन बनवेल, असंही रॉय यांनी म्हटलं आहे.