PM Modi Wishes Virat Kohli-Anushka Sharma: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना गोड बातमीबद्दल पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा (View Tweet)
PM Narendra Modi & Virat-Anushka (Photo Credits: Twitter/ Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर देशातील राजकारण, मनोरंजन, खेळ समवेत इतर क्षेत्रांतील दिग्गजांही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवले. या खास दिवशी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यावर धन्यवाद म्हणत मोदींनी गोड बातमीबद्दल विरुष्काचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. (अनुष्का शर्मा-विराट कोहली यांनी RCB टीम सह केक कापून साजरा केला आनंद, Watch Video)

विराट कोहली याने पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, "माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा." यावर मोदींनी लिहिले, "धन्यवाद विराट कोहली. मी तुला आणि अनुष्का शर्माला शुभेच्छा देऊ इच्छितो. मला विश्वास आहे की, तुम्ही दोघेही उत्तम पालक व्हाल." (Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्का शर्मा ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला बेबी बंपचा फोटो, करीना कपूर, मौनी रॉयसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्समधून दिल्या शुभेच्छा)

PM Narendra Modi Tweet:

काही दिवसांपूर्वीच विरुष्काच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. खास फोटो शेअर करत विरुष्काने आम्ही दोघांचे तीन होणार असून नवा पाहुणा जानेवारी 2021 मध्ये येईल, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता पंतप्रधान मोदींनी आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सध्या विराट आणि अनुष्का आयपीएल 2020 साठी UAE मध्ये आहेत. उद्यापासून आयपीएलच्या 13 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. या सीजनमध्ये विराट कोहलीची टीम RCB आपले पहिले आयपीएल चषक जिंकले का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.