बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी अलिकडेच गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असून लवकरच त्या दोघांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. अनुष्काने बेबी बंप सह फोटो शेअर करत लिहिले, "आता आम्ही तीन होणार आहोत. जानेवारी 2021 मध्ये येणार आहे." यानंतर सोशल मीडियावर चाहते आणि बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्स यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या पोस्टला सोशल मीडियावर 15 मिलियन हून अधिक लाईक्स मिळाले. त्यामुळे ही सोशल मीडियावरील सर्वाधिक आवडती पोस्ट बनली आहे.
विराट आणि अनुष्का सध्या आयपीएल साठी दुबईत आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांनी आरसीबी (RCB) टीम सह आपला आनंद साजरा केला. यासाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील केक कटींग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. आयुष्यातील हे सुंदर क्षण विराट-अनुष्का एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडिओत विरुष्कासोबत क्रिकेटर युजवेंद्र चहल देखील दिसत आहे. (विराट कोहली-अनुष्का शर्माच्या 'गुड न्यूज' नंतर युजवेंद्र चहल, क्रिस गेलसह खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव)
पहा व्हिडिओ:
🎥 | @AnushkaSharma and @imVkohli cutting cake with the team of @RCBTweets 💕 pic.twitter.com/rAHOWt98Zk
— Anushka Sharma FC™ (@AnushkaSFanCIub) August 29, 2020
11 डिसेंबर 2017 मध्ये विराट आणि अनुष्का इटलीत विवाहबद्ध झाले. विरुष्का सोशल मीडियावर चांगलेच हिट आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ही गोड बातमी सांगून चाहत्यांना आनंदीत केले आहे. दरम्यान करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी देखील दुसऱ्यांना आई-बाबा होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी चाहत्यांना दिली.