Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात AIIMS (All India Institute of Medical Sciences) ची फॉरेन्सिक टीम (Forensic Team) अंतिम वैद्यकीय रिपोर्ट पुढील आठवड्यात सीबीआयकडे सादर करणार आहे. मेडिकल बोर्ड मिटिंग आणि त्यानंतर सीबीआयसोबत झालेल्या बैठकीनंतर फॉरेन्सिक टीम प्रकरण समजून घेण्याच्या प्रक्रीयेत असून पुढील आठवड्यात मेडिकल बोर्डाचे मत सीबीआयसमोर मांडण्यात येईल. हे मत गोंधळ किंवा शंकांपासून मुक्त असेल, अशी आशा आहे, असे AIIMS च्या फॉरेन्सिक टीमचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता (Dr. Sudhir Gupta) यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अंतिम वैद्यकीय मत नोंदवण्यापूर्वी सेंट्र्ल फॉरेन्सिंक सायन्स लॅबोरॅटरीचे (Central Forensic Science Laboratory) तपास आणि सीबीआयचा शोध समजून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. डॉ. गुप्ता हे सुशांत मृत्यू प्रकरणात मेडिकल बोर्डाचे चेअरमन आहेत.

ANI Tweet:

सुशांतचा मृत्यू विष दिल्यामुळे झाला का हे तपासण्यासाठी AIIMS ची फॉरेन्सिंग टीमकडून viscera टेस्ट करण्यात आली, असे 7 सप्टेंबर दिलेल्या वृत्तात ANI ने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणी फॉरेन्सिंग परिक्षण आणि पुढील तपास करण्यासाठी सीबीआयने दिल्लीहून तीन डॉक्टरांची टीम सुशांतच्या मुंबईतील घरी गेल्या आठवड्यात पाठवली होती. अलिकडेच ड्रग्स डिलिंगप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला नारकोटिक्स ब्यूरो कंट्रोलकडून अटक करण्यात आली आहे. (ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB च्या अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती कडून अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यानावाचा खुलासा)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतअवस्थेत आढळला होता. त्यानंतर कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप करत पटना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मुंबई-पटना पोलिसांच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. त्यानंतर ड्रग्सच्या अनुषंगाने होणार तपास NCB करत आहे.