Sushant Singh Rajput Case चा तपास करणाऱ्या NCB च्या विशेष पथकातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; श्रुति मोदी ची चौकशी न करता पाठवणी
NCB Office (Photo Credits-ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा शोध ड्रग्सच्या अनुषंगाने होत आहे. यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (Narcotics Control Bureau) स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (Special Investigation Team) काम करत आहे. दरम्यान, या टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एका अधिकाऱ्याचे अँटीजन टेस्ट रिपोर्ट (Antigen Test Report) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी इतर अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल आणि इतर सर्व नियमांचे पालन देखील केले जाईल.

दरम्यान सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर श्रुति मोदी (Shruti Modi) ही चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल झाली होती. काल श्रुति हिला समन्स बजावण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चौकशी न करता श्रुतिला परत पाठवण्यात आले आहे. (Sushant Singh Rajput Case: रोहन राय याच्या सुरक्षेसाठी आमदार नितेश राणे यांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; दिशा-सुशांत आत्महत्या प्रकरणात रोहनचा जबाब महत्त्वाचा)

ANI Tweet:

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty), सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांच्यासह अन्य लोकांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा जामिन नाकारला असून त्यांना 14 दिवसांची NCB कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, सुशांत आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या आत्महत्येचा एकमेकांशी संबंध असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे दिशाचा लिव्ह-इन पार्टनर रोहन राय याचा जबाब या प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकतो. म्हणून रोहन याला मुंबईत परतण्यासाठी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी नितेश राणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.