Sushant Singh Rajput Case: रोहन राय याच्या सुरक्षेसाठी आमदार नितेश राणे यांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; दिशा-सुशांत आत्महत्या प्रकरणात रोहनचा जबाब महत्त्वाचा
Nitesh Rane | Photo Credits: Twitter)

भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिचा लिव्ह इन पार्टनर रोहन राय (Rohan Rai) याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहून नितेश राणे यांनी रोहन राय याला सुरक्षा प्रदान करावी असे म्हटले आहे. रोहन राय हा दिशा सॅलियन हिचा लिव्ह-इन-पार्टनर होता. या पत्रात आमदार नितेश राणे यांनी लिहिले की, "सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन या दोघांचाही मृत्यू गूढ पद्धतीने झाला आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मी हे लिहित आहे. रोहन राय हा नवोदित कलाकार असून तो दिशा सॅलियन सोबत लिव्ह-इन मध्ये राहत होता. दिशाने 8 जून 2020 रोजी आत्महत्या केल्यानंतर त्याची मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे."

"दिशा सॅलियन हिने तिच्या उंच इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली तेव्हा रोहन घरातच होता. तरी देखील घटनास्थळी तो 20-25 मिनिटांनंतर पोहचला. हे वागणे अत्यंत संशयास्पद आहे," असेही नितेश यांनी पत्रात म्हटले आहे. (Sushant Singh Rajput Death Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कमरजित सिंग, ड्वेन फर्नांडिस आणि संदीप गुप्ता यांना कोर्टाने सुनावली येत्या 16 सप्टेंबर पर्यंत NCB कोठडी)

Nitesh Rane Tweet:

दिशाच्या आत्महत्येनंतर रोहनने मुंबईतून पळ काढला किंवा चौकशी टाळण्यासाठी त्याला मुंबई सोडण्यास सांगितले असेल. काही लोकांच्या दबावामुळे त्याला मुंबई परत येण्याची भीती वाटत असावी, असा माझा अंदाज आहे. म्हणून तुम्ही त्याला सुरक्षा प्रदान करावी, अशी मी विनंती करतो. सुरक्षा दिल्याने तो सुखरुप मुंबईत परत येईल. सीबीआय तपासासाठी त्याचे स्टेंटमेंट खूप उपयुक्त ठरेल. त्याच्या स्टेटमेंटमुळे सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी सुरु असलेल्या तपासाला वेगळी दिशा मिळू शकते. कारण दिशा आणि सुशांतचा मृत्यू याचा एकमेकांशी संबंध आहे, असे मला वाटते.

दरम्यान सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ड्रग्सच्या अनुषंगाने सुरु असून रिया चक्रवर्ती सह शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकजण NCB कोठडीत आहेत.