Sushant Singh Rajput Death Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कमरजित सिंग, ड्वेन फर्नांडिस आणि संदीप गुप्ता यांना कोर्टाने सुनावली येत्या 16 सप्टेंबर पर्यंत NCB कोठडी
NCB Office (Photo Credits-ANI)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी करण्यात येणाऱ्या तपासात आता ड्रग्जचे प्रकरण सुद्धा समोर आले आहे. या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून याआधील रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतसह शौविक चक्रवर्ती यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रिया हिला सध्या मुंबईतील भायखळा मधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तसेच या सर्वांनी आपला जामीन अर्ज दाखल केला असता तो कोर्टाने फेटाळून लावला आहे. याच पार्श्वभुमीवर आता कोर्टाने अजून एक निर्णय दिला आहे. ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कमरजित सिंग, ड्वेन फर्नांडिस आणि अंकुश अनरेजा यांना कोर्टाने सुवानली येत्या 16 सप्टेंबर पर्यंत NCB कोठडी सुनावली आहे.(Sushant Singh Rajput Case: अंकिता लोखंडे चे शिबानी दांडेकर ला सडेतोड उत्तर, '2 सेकंदाचे फेम' कमेंट्सवर दिली 'ही' प्रतिक्रिया)

तसेच संदीप गुप्ता आणि अफ्ताफ फतेह अन्सारी यांना सुद्धा ड्रग्ज प्रकरणी येत्या 23 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे. तर गेल्या 2-3 दिवसांपूर्वी एनसीबीकडून अंधेरीतील एका व्यक्तीला याच ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.(Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput Smoking Video: रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत चा 'स्मोकिंग व्हिडिओ' व्हायरल)

ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी याला एनसीबीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याला ही येत्या 23 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शन मध्ये अटकेत असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीने एनसीबीकडे  बॉलिवूडमधील काही मोठी नावं घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्स नुसार, यामध्ये अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह  आणि फॅशन डिझायनर सिमोन खंभाट्टा यांच्या नावाचा खुलासा रियाने केला आहे. रियाकडून 25 सेलिब्रिटींच्या नावांची पोलखोल करण्यात आल्याची चर्चा आहे.