Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणींच्या विरोधातील याचिकेवर आज बॉम्बे हायकोर्ट जाहीर करणार निर्णय
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

Sushant Singh Rajput Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणींच्या विरोधात गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात रिया चक्रवर्ती हिने एक याचिका दाखल केली होती. त्याचसोबत मुंबई पोलिसात त्या बद्दल एफआयआर सुद्धा दाखल केला होता. त्यानुसार सुशांत याच्या अनुपस्थितीशिवाय डॉक्टरांकडून औषध घेत त्याला दिल्याचा आरोप रिया हिने बहिणींवर लावला आहे. याच बद्दल आज बॉम्बे हायकोर्टाकडून निर्णय सुनावला जाणार आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांतचा मित्र, Assistant Director Rishikesh Pawar चौकशी साठी एनसीबीच्या ताब्यात)

रिया चक्रवर्ती हिने आपल्या तक्रारीत असे म्हटले होते की, प्रियंका आणि मीतू सिंह यांनी दिल्लीतील डॉक्टर तरुण कुमार याच्यासोबत मिळून सुशांतसाठी खोटे प्रिस्क्रिप्शन लिहिले होते. सुशांत याची मानसिक अवस्था जाणल्याशिवाय ही औषधे लिहिली गेली होती. तिने असा सुद्धा आरोप लावला आहे की, सुशांतल्या 8 जूनला या औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले गेले होते आणि 14 जूनला अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. यासाठी तिघांवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

रिया हिने दाखल केलेल्या केसनंतर सुशांत सिंह याच्या बहिणींनी बॉम्बे हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यांनी रिया हिचा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. सुशांतच्या बहिणींचा वकील विकास सिंहने याचिकेत असे म्हटले होते की, रिया चक्रवर्ती हिचे आरोप बिनबुडाचे आणि तिच्या व्यतिरिक्त कठोर कारवाई करावी. त्यांनी असे सुद्धा म्हटले की, रियाने एफआयआर फक्त यासाठी दाखल केला होता कारण सुशांतच्या मृत्यूप्रकरणात दुर्लक्ष होईल.

सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये बांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. एका बाजूला मुंबई पोलीस या प्रकरणाकडे सुशांतने आत्महत्या केली असल्याचे मानत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुशांतच्या घरातील मंडळींनी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत याला जबरदस्तीने ड्रग्ज देणे आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत केस दाखल केली होती. या प्रकरणी सीबीआय कडून तपास केला जात आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी उपस्थित केले 7 प्रश्न; रिया चक्रवर्तीने लॅपटॉप, दागदागिने, क्रेडिट कार्ड नेले, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले, जाणून घ्या सविस्तर)

तसेच सुशांत याच्या मृत्यूप्रकरणात जेव्हा ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला तेव्हा बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांची नावे सुद्धा समोर आली होती. एनसीबीकडून आतापर्यंत या प्रकरणी 31 जणांना अटक करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती हिला सुद्धा अटक करण्यात आली होती. पण सध्या ती जामिनावर बाहेर आहे.