Sushant Singh Rajput Case: सुशांतचा मित्र, Assistant Director Rishikesh Pawar चौकशी साठी एनसीबीच्या ताब्यात
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

जून 2020 मध्ये बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांतसिंह रजपूतचं (Sushant Singh Rajput) अकाली निधन अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारं होतं. सध्या सुधांतच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. आज सुशांटचा मित्र ऋषिकेश पवार (Rishikesh Pawar) ला एनसीबीने (NCB) ताब्यात घेतलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एनसीबीने समन्स पाठवल्यापासून तो फरार होता मात्र आता त्याला चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

ऋषिकेश पवार हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता. तो सुशांतच्या मित्रांपैकी एक आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार सुशांतच्या डीम प्रोजेक्ट्सचा देखील तो एक भाग होता. काही दिवसांपूर्वी एनसीबीने ऋषीकेश पवारच्या घरी धाड टाकली होती तेव्हा त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी ऋषीकेशने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात देखील धाव घेतली होती मात्र त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता.

ANI Tweet

बॉलिवूड मधील अनेक कलाकार सध्या एनसीबीच्या रडार वर आहेत. दरम्यान सुशांतसिंह रजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना देखील एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी काही काळ जेल मध्ये करण्यात आली होती. मात्र सध्या हे दोघेही जामीनावर सुटले आहेत. सध्या त्यांना भारत सोडण्यास बंदी आहे.