दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची प्रमुखे भूमिका असलेला 'छिछोरे' (Chhichhore) चित्रपटाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान च्या आठवणी आजही या टिमच्या मनात कायम आहेत. त्यात सुशांतची झालेली अचानक एक्झिट या चित्रपटाच्या टीमला चटका लावणारी होती. म्हणून आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने सुशांतच्या आठवणीत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या गंमतीजमती दाखवण्यात आल्या आहेत.
हा व्हिडिओ पाहून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या कलाकारांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतची बरीच धमालमस्ती त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. श्रद्धा कपूरने सुशांतच्या आठवणीत हा व्हिडिओ शेअर केला आहे. RIP Sushant Sing Rajput: छिछोरे सिनेमात अखेरचा झळकला होता सुशांत सिंह राजपूत; पहा आत्महत्याग्रस्त मुलाला प्रेरणा देणारा हा त्याचा हृदयस्पर्शी सीन (Watch Video)
तर या चित्रपटातील अभिनेता वरुण शर्मा याने देखील इन्स्टावर कम्मो असे लिहिले आहे. हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे या चित्रपटात वरुण सुशांतला कम्मो म्हणून संबोधले आहे.
दरम्यान, सुशांतने केमिकल इंजिनिअर ते अभिनेता हा मोठा प्रवास केला आहे. मात्र अल्पावधीतच सुशांतने आपल्या जबरदस्त अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये एक ठसा उमटविला होता. त्याचे असे निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले आहे. त्याच्या निधनाने बॉलिवूड मध्ये एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याचे दुःख पाहायला मिळत आहे.