Sushant Sing Rajput Suicide: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने (Sushant Singh Rajput) रविवारी वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. तो 34 वर्षांचा होता. ही बातमी निश्चितच सर्वांसाठी धक्कादायक आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून सुशांतने मानसिक नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या करिअरचा शेवटचा ठरलेल्या सिनेमा छिछोरे (Chhichhore) मधील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, आता हा योगायोग म्हणाले किंवा आणखीन काही, मात्र या सिनेमात सुशांतने एक मध्यम वयीन बापाची भूमिका साकारली होती जो आपल्या मुळा आत्महत्या (Suicide) करण्यापासून थांबवून एक नवीन आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो, आयुष्यात संकट येणारच पण त्यावर उत्तर म्हणजे आत्महत्या नाही असा ठाम विचार या सिनेमात मांडला आहे, आणि हाच सिनेमा सुशांतच्या आयुष्यातील शेवटचा सिनेमा ठरणे याहून दुर्दैव काय म्हणता येईल.Sushant Singh Rajput Death: केमिकल इंजिनिअरींग सोडली अन् अभिनय क्षेत्राकडे वळला; जाणून घ्या सुशांत सिंह राजपूत याचा जीवनप्रवास
नितेश तिवारी दिग्दर्शित छिछोरे या सिनेमात सुशांत ने आपल्या चित्रओतील मुलासोबत एक सीन दिला आहे, ज्यात तो आपल्या मुलाला आत्महत्येचा कधीही विचार करू नकोस असे समजावत आहे. हा सीन बघून कोणाच्याही डोळ्यात चटकन पाणी येईल.(Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना)
सुशांत सिंह राजपूत चा छिछोरे सिनेमातील सीन
दरम्यान, सुशांतने केमिकल इंजिनिअर ते अभिनेता हा मोठा प्रवास केला आहे. मात्र अल्पावधीतच सुशांतने आपल्या जबरदस्त अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये एक ठसा उमटविला होता. त्याचे असे निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले आहे. त्याच्या निधनाने बॉलिवूड मध्ये एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याचे दुःख पाहायला मिळत आहे. सुशांतच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना!