अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने इन्स्टाग्रामवर 50 मिलियन्स फॉलोअर्स झाल्याबद्दल आपल्या चाहत्यांना मराठीत पत्र लिहून मानले आभार, पत्र वाचून चाहतेही गेले भारावून
Shraddha Kapoor (Photo Credits: Instagram)

आपल्या दमदार अभिनयाच्या, नृत्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या प्रचंड खूश आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. लोकांनी केलेल्या भरघोस प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मराठी, इंग्रजी आणि हिंदीत या भाषेत पत्र लिहिले आहे. मात्र मराठीतील तिच्या हस्ताक्षरातील पत्र पाहून चाहते प्रचंड भारावून गेले आहेत. या पत्राद्वारे तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पत्रात तिने आपल्या चाहत्यांना खास नावाने संबोधले आहे.

श्रद्धाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'माझे लाडके जेम्स, बाबुडी, फॅन क्लब आणि हितचिंतकांनो, तुमचे व्हिडिओ, फोटोजच्या माध्यमातून मला दिलेले प्रेम बघून मी भारावून गेले आहे. मी आज तुमच्यामुळे येथे आहे. तुमचे प्रेम असेच माझ्यावर कायाम राहो. सर्वांनी काळजी घ्या आणि एकमेकांनी प्रेमाने वागा.' Gudi Padwa 2020: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने अस्सल मराठीत दिल्या गुढीपाडवा च्या शुभेच्छा; आजी, आई सोबतचा 'हा' खास फोटो केला शेअर (See Photo)

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

🙏🦋🦄 🌻💫💜

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on

श्रद्धाने इन्स्टाग्रामवर हे पत्र शेअर करुन या पत्राला साडे सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. श्रद्धाची आई मराठी असल्यामुळे तिला मराठीबद्दल फार प्रेम आहे. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लव्ह मॅरेज केलं आहे. आई आणि मावशी मराठी असल्याने श्रद्धाला अतिशय उत्तम मराठी बोलता व लिहिता येते.