![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/12/Sunny-Leone-380x214.jpg)
बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी नेहमीच तिच्या परफेक्ट फॅशन स्टेटमेंटसाठी चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो देखील फॅन्सची पसंती ठरतात. इतकंच नव्हे तर सनी तिच्या फॅन्सना नेहमीच तिच्या आयुष्यातील घडामोडींविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेटेड ठेवत असते. अलीकडेच तिने एक नवे अभियान तिच्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर सुरु केले आहे. लेदरच्या वस्तूंच्या विरोधात सनीने हे नवं अभियान सुरू केले आहे. तिच्या का अभियानात विशेष करून फॅशनच्या वस्तूंमध्ये लेदरच्या वस्तू वापरायला विरोध दर्शवला आहे.
सनीच्या तिच्या या अभिनयनाचा मूळ हेतू म्हणजे प्राण्यांचे रक्षण करणे आहे. सनीच्या मते, फॅशनसाठी एखाद्या प्राण्याची हत्या करून त्याच्या चामड्यापासून आकर्षक वस्तू करणे तिला अजिबात मान्य नाही. सनीच्या या अभियानासाठी प्राणी हक्क संघटना 'पेटा'ने तिच्यासोबत एक करार केला आहे.
दरम्यान, तिने याही आधी या संस्थेसोबत अनेकदा काम केले आहे. या आधी तिच्या एका अभिनयात, कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांसोबत कशी वर्तवणूक करायची याबद्दलचे ते अभियान होते.
Sunny Leone ने का मागितली Sunny Deol ची जाहीर माफी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट करत या नव्या अभियानाबद्दल सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिच्या फॅन्सनी तिला या नव्या उपक्रमासाठी कमेंट्सच्या माध्यमातून भरगोस प्रतिसाद दर्शवला आहे.
सनी नेहमीच अशा कार्यांमध्ये कार्यरत असते. यापूर्वी तिने शेल्टर होममधून एका कुत्र्यालाही दत्तक घेतलं आहे. इतकंच नव्हे तर तिने मांसाहार खाणं सोडून दिलं आहे.