Sunny Leone ने का मागितली Sunny Deol ची जाहीर माफी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Sunny Leone and Sunny Deol (Photo Credits: Instagram)

Sunny Leone Apologises To Sunny Deol: बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. तिच्या हॉट फोटोंपासून, ते तिच्या करिअरमधील महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत ती सर्व काही तिच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. नुकतंच तिने केलेलं एक कृत्य चर्चेचा विषय ठरलं आहे. सनी लिओनीने सनी देओलची (Sunny Deol) जाहीर माफी मागितली आहे.

होय, सनी लिओनने 400 लोकांसमोर सनी देओलची माफी मागितली आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिने सनी देओलची माफी का मागितली असावी?

तर सिंगापूर येथे आयबीएफए अर्थात आंतरराष्ट्रीय भोजपुरी फिल्म पुरस्कार आयोजित करण्यात आले आहेत. या पुरस्कार सोहळ्याला, सनी लिओन, सनी देओल, जरीन खान यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी  हजेरी लावली होती.

त्याचसोबत भोजपुरी इंडस्ट्रीचे सुपरस्टार मनोज तिवारी, रवी किशन, निरहुआ हे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. आणि जवळजवळ 400 लोकांपुढे सनी लिओनीने सनी देओलची माफी मागण्याचे कारण जाणून घेतल्यास आश्चर्यचकित व्हाल. सनी लिओनी, सनी देओलला म्हणाली की, "मला तुझी जाहीर माफी मागायची आहे. कारण तुझे आणि माझे नाव सनीच असल्यामुळे, आपल्यावर बरेच मिम्स आणि विनोद केले जात आहेत."

Sunny Leone प्रदीर्घ काळानंतर Bikini अवतारात, चाहते घायाळ; पाहा फोटो

हे ऐकताच सनी देओल तिच्याकडे बघून हसला आणि डोके हलवले. तसेच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी टाळ्यांचा जयघोष केला.

दरम्यान, यावर्षी सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय भोजपुरी फिल्म पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात, भोजपुरी मनोरंजन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित सर्व कलाकार उपस्थित होते.