Sunny Leone हिचा पती डेनियल वेबर याच्या कारचा क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक
सनी लिओनी. (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone)  सध्या चर्चेत आहे. सनी कधी आपल्या कामामुळे तर कधी आपल्या लूक मुळे नेहमीच सर्वांवर आपली छाप पाडते. अशातच एक बातमी समोर आली आहे की ती स्वत: नव्हे तर नवऱ्याच्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील कारण आहे ते म्हणजे गाडीचा खोटा क्रमांक. खरंतर पोलिसांनी कल्याण मधील एका उद्योगपतीला अटक केली आहे. ज्याच्या कारवर बनावट क्रमांक आहे. कारण त्याच्या गाडीचा क्रमांक हा सनी लिओनी हिचा पती डेनियल वेबर (Daniel Weber) याच्या नावावर रजिस्टर आहे.

खरंतर गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात सनी लिओनी हिच्या नवऱ्याने वाहतूकीचे नियम मोडल्याने त्याला बहुतांश वेळा चलान पाठवण्यात आले. त्यानंतर सनी हिने त्यावर उत्तर देत म्हटले की, चलान दिले त्यावेळी नवरा तेथे नव्हताच. त्यानंतर तिच्या टीमने जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.(Kapil Sharma याला झालंय तरी काय? व्हीलचेअरमध्ये बसून विमानतळावरुन बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद; चाहत्यांनाही बसला धक्का पाहा Video)

या घटनेची सत्यता अशा वेळी बाहेर आली जेव्हा सनी लिओनी हिच्या ड्रायव्हरने मंगळवारी डेनियल सारखी कार आणि त्याच क्रमांक असलेली कार पाहिली. त्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तेथेच कारला अडवले. कारमधील व्यक्ती पियूष सेन याला या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्थानक नेण्यात आले. तेथे त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली तेव्हा त्याने ती नसल्याचे म्हटले. चौकशीत व्यक्तीने असे म्हटले की, ती गाडी त्याची नाही आहे. तसेच डेनियल याने त्याच्या गाडीचे कागदपत्र सुद्धा पोलिसांसमोर सादर केले. सध्या या प्रकरमी पियूष सेन याच्या विरोधात मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.