दरवर्षीप्रमाणे यंदाही डब्बू रत्नानीच्या (Dabboo Ratnani) 2019 या नव्या वर्षाच्या कॅलेंडरची सर्वांनाच उत्सुकता होती. या कॅलेंडरमधील हॉट, बोल्ड लूक अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 36 वर्षांची ही 'बेबी डॉल' लाल रंगाच्या जॅकेटमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे. डब्बू रत्नानीच्या फोटोशूटसाठी सनी या आकर्षक हॉट अवतारात दिसत आहे.
"डब्बू रत्नानीच्या 2019 च्या कॅलेंडरसाठी शूट करताना मला खूप मज्जा आली," असं लिहीत सनीने हा हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यापूर्वी सनीने 2017 मध्ये डब्बूच्या कॅलेंडरसाठी खास शूट केले होते. त्यानंतर 2018 मध्ये कॅलेंडरवर तिचा 'bad wifey' अवतार पाहायला मिळाला. (कन्नडची युवासेना आक्रमक, सनी लिओनीच्या चित्रपटाला विरोध)
सनी शिवाय अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय-बच्चन, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, हृतिक रोशन, क्रिती सेनन, टायगर श्रॉफ, विद्या बालन, फराहन अख्तर यांसारखे स्टार्स डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर झळकणार आहेत.