Photo : सनी लिओनीने मुलीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
सनी लिओनी (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी मुलगी निशाचा वाढदिवस हटके स्टाईलने साजरा केला. सनीची मुलगी निशाचा तिसरा वाढदिवस होता. या निमित्ताने सनीने निशासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, "जगातील सर्वात सुंदर असलेल्या माझ्या एंजलसाठी. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस. तू नेहमीच मला आनंद देत असतेच. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, याचा कदाचित तुला अंदाज नाही."

दुसऱ्या फोटोत निशा खूपच आनंदी दिसत असेल. त्यावर सनी म्हणते, "तिच्या हास्यातून सर्व काही स्पष्ट होतं. हॅपी बर्थडे बेबी गर्ल. मला तुझा अभिमान आहे."

 

View this post on Instagram

 

This smile pretty much sums it all up! Happy Birthday baby girl! I’m so proud of you!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीनंतर डॅनिअलनेही मुलीसोबतचा फोटो इंस्टग्रामवर शेअर केला. या फोटोत निशा, सनी आणि डॅनिअल एका बोटीत बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत डॅनिअलने देखील एक भावूक पोस्ट केली आहे.

त्यात डॅनिअलने लिहिले की, "माझी बेबी गर्ल निशा कौरला तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे वरदानच. तुला आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तू माझ्या आनंदाचं कारण आहेस."