कन्नडची युवासेना आक्रमक, सनी लिओनीच्या चित्रपटाला विरोध
फोटो सौजन्य- इंस्टाग्राम

सध्याची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी तिचा आगामी चित्रपट 'वीरमदेवी' मधून झळकणार आहे. मात्र सनीला या चित्रपटात घेतल्याने वीरमदेवीची भूमिका दिल्याने कन्नड युवासेना आक्रमक झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या या वीरमदेवीचा अपमान झाल्याचे युवासेनाकडून सांगण्यात येत आहे.

पूर्वीची पॉर्न स्टार आणि आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सनी लिओनी वीरमदेवी या चित्रपटात कर्नाटकातील प्रसिद्ध देवीची मुख्य भुमिका साकारणार आहे. सनीने या चित्रपटात काम करणे म्हणजे ऐतिहासिक चरित्राचा अपमान केल्यासारखे असल्याचे कन्नड रक्षना वेदिकेच्या युवासेनेने म्हटले आहे. तसेच पद्मावतच्या वेळी जसा विरोध झाला तसाच जोरदार विरोध या चित्रपटाला करु असा इशारा चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला आहे.

सनीच्या देवी रुपातील भूमिकेमुळे युवासेना आक्रमक झाली आहे. तर काही कर्नाटकातील तरुणांनी हातावर ब्लेडने वार करुन या चित्रपटाला लाल कंदिल दाखवला आहे. या संघटेनेचे प्रमुख यांनी वीरमदेवी हिची कर्नाटकामध्ये अनेक मंदिरे आहेत असं सांगितले आहे. त्यामुळे सनी लिओनीने सारख्या एका पॉर्न स्टारने देवीची भूमिका करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.