Sonu Sood to Launch Full Scholarship:  गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी सोनू सूद करणार मदत; आईच्या नावाने लॉन्च केली स्कॉलरशिप (View Post)
Sonu Sood (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकट काळात (Coronavirus Pandemic) बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गरजूंसाठी देवदूत ठरला. तेव्हापासून सुरु झालेले मदतकार्य अद्याप सुरुच आहे. सोनू सूदची मदत अनेक गरजूंसाठी आशीर्वादासमान ठरत आहे. स्थलांतरीत मजूरांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर सोनू सूद ने मदतीचा ओघ विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. कोरोना संकट काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देणे अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे. त्या सर्वांसाठी सोनू सूद मदतीचा हात पुढे करत आहे. आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (Scholarship) लॉन्च करत असल्याचे सोनू सूद याने सांगितले आहे. (JEE, NEET Exams: विद्यार्थ्याचा रडतानाचा व्हिडिओ पाहून सोनू सूद भावूक; 3 राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहण्याचे आश्वासन)

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूद याने स्कॉलरशिप प्रोग्रॅम लॉन्च केला आहे. या प्रोग्रॅमला त्याने आपल्या दिवंगत आई प्राध्यापिका सरोज सूद यांचे नाव दिले आहे. आपल्या मुलांना शिक्षक देण्यासाठी झटत असलेल्या गरीब, वंचितांचा संघर्ष मी गेल्या काही महिन्यांत पाहिला आहे. काहींकडे ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी स्मार्टफोन नव्हता. तर काहींकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून मी. माझी आई प्राध्यापिका सरोज सूद यांच्या नावाने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात यावी यासाठी देशभरातील विद्यापीठांशी टायअप केले आहे. माझी आई पंजाब मधील मोगा येथे विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असे. तिचे हे कार्य मी पुढे सुरु ठेवावे, अशी तिची इच्छा होती आणि तीची इच्छा पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते.

 Sonu Sood Tweet:

या स्कॉलरशिप प्रोग्रॅम मध्ये अनेक कोर्सेसचा अंतर्भाव केला आहे. डेटा सायन्स, पत्रकारीता, बिझनेस स्टडीज, मेडिसिन्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, रोबोटिक्स आणि अन्य. वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या घरातूनही येणारे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरतील. फक्त त्यांची अभ्यासातील प्रगती चांगली असावी ही एकच अट आहे. अशा विद्यार्थ्यांची कोर्स फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च आणि इतर गोष्टींची काळजी आम्ही घेऊ, असे सोनू सूद याने सांगितले. स्कॉलरशिप ही संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील, याची मला खात्री आहे, असेही तो म्हणाला.