JEE, NEET Exams: विद्यार्थ्याचा रडतानाचा व्हिडिओ पाहून सोनू सूद भावूक; 3 राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहण्याचे आश्वासन
Sonu Sood (Photo Credits: Instagram/Twitter)

सध्या जेईई आणि नीट परीक्षेचा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. कोविड-19 संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी, पालक यांच्या सह राजकीय नेते करत आहेत. तर परीक्षा होणारच असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती, आर्थिक अडचणी यामुळे परीक्षा सेंटरपर्यंत जाणे काही विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे. दरम्यान अभिनेता सोनू सूद याने देखील JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी केली होती. मात्र आता सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनू सूद याने विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटर पर्यंत पोहचवण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक विद्यार्थी रडताना दिसत आहे. परीक्षा सेंटर घरापासून खूप दूर आहे. तसंच पूर आणि कोरोना संकटात परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी हजार रुपयांची मागणी करत आहे. हा व्हिडिओ पाहून सोनू सूद देखील भावूक झाला आणि त्याने या विद्यार्थ्यासह अशा प्रकारच्या संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पूरग्रस्त राज्यांमध्ये राहणारे आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्व तपशील सोनू सूद याने मागवला आहे.

Sonu Sood Tweet:

कोरोना व्हायरस देशभरात धुमाकूळ घालत आहे. या कठीण काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पोहचवणे, त्यांच्या अन्नपाण्याची सोय करणे यासह कोरोना योद्धांच्या राहण्याची व्यवस्था देखील पाहणे. गरजूंसाठी नोकरीची व्यवस्था करणे अशी अनेक कामे सोनू सूद याने केली आहेत.