Sonu Sood बनवत आहेत देशातील सर्वात मोठी Blood Bank; जाणून घ्या कशा पद्धतीने करणार काम
Sonu Sood (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांचे कोरोना विषाणू महामारीच्या काळात सामाजिक सेवा सुरू करण्याचे ध्येय वेगवेगळ्या स्वरूपात सुरूचं आहे. आता सोनूने देशातील सर्वात मोठी रक्तपेढी (Blood Bank) तयार करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. रक्तदात्यांना ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्याशी जोडणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. सोनू सूद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे सांगितलं आहे की, 'दररोज 12 हजार लोक रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात. आपले वीस मिनिटे एखाद्याचा जीव वाचवू शकतात. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला डॉक्टर बनण्याची आवश्यकता नाही.' या व्हिडिओमध्ये नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. सोनू सूद यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, 'चला जीव वाचवू या. तुमची स्वतःची रक्तपेढी लवकरचं येणार आहे.' (वाचा - Amitabh Bachchan Health Update: शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लेटेस्ट फोटो; म्हणाले -' दृष्टीहीन आहे दिशाहीन नाही')

वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, सोनू सूद 'सोनू फॉर यू' नावाचे एक अॅप लॉन्च करणार आहे. जे रक्तदात्यांना आणि गरजूंना जोडेल. या अ‍ॅपद्वारे, ज्याला रक्ताची आवश्यकता आहे, अशा व्यक्तीने रक्तदात्याशी संपर्क साधला जाईल आणि रिक्वेस्ट मिळाल्यावर रक्तदाता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्यास सक्षम असेल. या रक्तपेढीद्वारे दुर्मिळ रक्तगटांच्या रक्ताची उपलब्धताही निश्चित केली जाईल.

लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम सोनूने केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात त्यांचे सामाजिक कार्य चालू आहे. मागासवर्गीयांसाठी ई-रिक्षांचे वितरणही त्यांनी सुरू केले. सोनूने तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुविधा देखील सुरू केली आहे.