Amitabh Bachchan Health Update: शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लेटेस्ट फोटो; म्हणाले -' दृष्टीहीन आहे दिशाहीन नाही'
Amitabh Bachchan । Photo Credits: Instagram

बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर घरी परतलेल्या बिग बींनी चाहत्यांचे आभार व्यक्त करत हेल्थ अपडेट शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर आज सकाळी त्यांनी एक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटो शेअर करत खास चारोळी शेअर केली आहे. यामध्ये ' मी दृष्टीहीन आहे पण दिशाहीन नाही..' असं म्हटलं आहे. Amitabh Bachchan Health Update: बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया- Reports.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच 78 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यावर एक शस्रक्रिया होणार असल्याचं म्हटलं होतं. पण ही शस्त्रक्रिया नेमकी कशाची होती हे सांगितलं नसल्यानं काही काळ त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र नंतर त्यांनी डोळ्याच्या ऑपरेशनचा उल्लेख करत त्यांचे हेल्थ अपडेट शेअर केले होते. यामध्येही पंचाहत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीवर डोळ्याचं ऑपरेशन या वयात कठीण समजलं जातं मात्र बीग बींवर सुदैवाने हे ऑपरेशन सुरक्षित झालं. आता हळूहळू रिकव्हरी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बीग बी अमिताभ बच्चन लवकरच नवा सिनेमा 'झुंड' घेऊन रसिकांसमोर येणार आहेत. या सिनेमाच दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून त्याचे या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.